
चुनाभट्टी येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने सात वर्षांच्या मुलाला खाऊ व पैशांचे आमिष दाखवून निर्जन स्थळी नेले. तेथे मुलावर त्याने लैंगिक अत्याचार केला तेव्हा मुलाने विरोध केला असता तरुणाने त्याचा गळा आवळून मुलाची हत्या केली. याप्रकरणीच चुनाभट्टी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी हा मूळचा बिहारच्या चंपारण्य येथील असून तो सध्या भिवंडी येथे राहत होता. बुधवारी रात्री उशिरा आरोपीने सात वर्षांच्या मुलाला खाऊ व पैशांचे आमिष दाखवत फूस लावून कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगरात असलेल्या एका निर्जनस्थळी नेले. तेथे कोणी नसल्याची संधी साधत त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केला तेव्हा मुलाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने मुलाचा गळा आवळून त्याला ठार मारले. याबाबत माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी आरोपीला अटक केली.