जुन्या नोटाची मूल्य काढून अधिक पैसे देऊ असे सांगून ठगाने महिलेची फसवणूक केली आहे. फसवणूक प्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
भांडुप येथे महिला राहते. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात महिलेच्या मुलाने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती. जर तुमच्याकडे जुन्या नोटा असल्यास त्याचे व्हॅल्यू काढून जास्त किंमत देऊ असे त्या जाहिराती मध्ये नमूद होते. त्या जाहिराती खालील नंबरवर महिलेच्या मुलाने पह्न करून योजनेची माहिती घेतली. ठगाने महिलेला जुन्या नोटांचे पह्टो पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने 20 आणि 5 रुपयाच्या जुन्या नोटांचे पह्टो पाठवले. तुम्हाला 20 आणि 5 रुपयाच्या नोटांच्या मोबदल्यात 25 लाख रुपये दिले जातील. त्यासाठी एक करार करावा लागेल. त्या करारासाठी 1250 रुपये खर्च येणार असल्याच्या त्याने भूलथापा मारल्या.
महिलेने एका खात्यावर पैसे पाठवले. पैसे पाठवल्यानंतर दोन नंबरवरून महिलेला पह्न आले. जीएसटी कर, विमानतळ, पोलीस याच्या नावाखाली महिलेकडून 2 लाख 81 हजार रुपये ठगाने उकळले. ठगाने महिलेकडे पुन्हा पैशाची मागणी केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.