![arrest](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/05/arrest-1-696x447.jpg)
किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची खळबळजनक घटना अंधेरीत घडली. मयत व्यक्तीच्या फिर्यादीवरून अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुजीत हरिवंश सिंह असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर सुनील परशुराम कोकाटे असे आरोपीचे नाव आहे.
सुजीत आणि सुनील दोघेही शेजारी शेजारी राहत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. हा वाद पुन्हा उफाळून आला. सुनीलने रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेला आणि सुनीलने सुजीतवर चाकूने हल्ला केला.
हल्ला केल्यानंतर सुनील पळून गेला. जखमी सुजीतला तात्काळ कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अंधेरी पोलिसांनी शोध मोहिम राबवत सुनीलला अटक केली आहे.