Mumbai crime news : मेरठ येथील ठकठक गँग गजाआड; 21 मोबाईल केले जप्त

 

मेरठ येथून मुंबईत येऊन मोबाईल आणि इतर वस्तू चोरी करणाऱया ठकठक गँगला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. फहीम शेख आणि मोहमद खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून 21 मोबाईल जप्त केले आहेत. शेख आणि खानच्या अटकेने काही गुह्यांची उकल होणार आहे.

मालाड येथे राहणाऱया एका जणाचे ठकठक गँगने साहित्य लांबवले. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयाने तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, तुषार सुखदेवे आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजवरून पोलिसांनी ठकठक गँगच्या मुसक्या आवळल्या. खान आणि शेख हे उत्तर प्रदेशच्या मेरठचे रहिवासी आहेत.

ते चोऱया करण्यासाठी मेरठ येथून मुंबईत यायचे. पोलिसांनी पकडू नये म्हणून ते सतत जागा बदलून राहत असायचे. चोरीचे मोबाईलचे सुट्टे भाग करून त्याची विक्री करायचे. त्या दोघांना नागपाडा येथील गेस्ट हाऊस येथून बेडय़ा ठोकल्या. खान आणि शेख हे सिग्नलवर लपून बसायचे. जेव्हा एखादी कार त्यांच्याजवळून वेगाने गेल्यावर ते ध्वज खाली टाकायचे. त्यानंतर ड्राईव्हरच्या बाजूची काच ठोकायचे. ड्राईव्हरने काच खाली केल्यावर त्याला गाडीतून बाहेर उतरण्यास भाग पाडायचे. ड्राईव्हरवर रॅश ड्रायविंगचा आरोप करून ते वाद घालायचे. त्यानंतर एक जण ड्राईव्हरसोबत वाद घालायचा, तर दुसरा हा साहित्य घेऊन पळ काढायचा अशी त्यांची गुह्याची पद्धत होती. त्या दोघांकडून पोलिसांनी 21 मोबाईल जप्त केले आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.