कुलाबा येथे मित्राच्या घरी राहत असलेल्या एका 58 वर्षीय महिलेचा 22 वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या महिलेच्या मित्राच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोवंडी येथे राहणाऱ्या त्या तरुणाला अटक केली.
बुधवारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणातील महिला तिच्या कुलाबा येथे राहणाऱया मित्राकडे आली आहे. त्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने महिलेचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तणुक केली. महिलेने घरी जाऊन दरवाजा लावून घेतला असता अज्ञात आरोपीने दरवाजाला बाहेरून कडी लावली. याप्रकरणी महिलेच्या मित्राच्या मुलाने तक्रार दिल्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नुरेन खलिद याला पोलिसांनी अटक केली.