
दर्ग्याच्या वादातून एकाच कुटुंबीयातील तिघांवर दुसऱया गटातील चौघांनी हत्याऱयाने वार केले. त्यात शाकीर अली शेख या पुरुषाचा मृत्यू झाला, तर महिलेसह दोन जण जखमी झाले. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून चौघांना अटक केली. मौलाना बाबा लेनमध्ये अफजल अली आझम अली शेख हा तरुण राहतो. त्याच परिसरात दर्ग्याच्या मालकी हक्कावरून शेख आणि खान कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता.