जे.जे. रुग्णालयातून आरोपी तरुणीचा पळायचा प्रयत्न

हत्येच्या गुह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणीने जेजे रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला; अखेर पोलिसांनी पाठलाग करून तिला पकडले. गेल्या वर्षी पनवेलमधील हत्याप्रकरणी सोनिया साकेत हिला ताब्यात घेतले होते. तिला पोलिसांनी अटक केली होती. ती सध्या भायखळा जेलमध्ये आहे. शुक्रवारी तिच्या बाळाची प्रकृती बिघडल्याने तिला तपासणीसाठी जेजे रुग्णालयात दाखल केले होते. पीआयसीयू वॉर्ड क्रमांक 37 मधून बाथरूमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून जाताना तिने गर्दीचा फायदा घेऊन पोलिसांच्या हाताला जोरात झटका दिला होता. त्यानंतर तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.