
पिस्तुले आणि जिवंत काडतुसे विकण्यासाठी मुंबईत आलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पकडले. अंधेरी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी हे यूपी, बिहार व हरियाणा येथील असून त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि 21 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. अंधेरी पश्चिमेकडील एका हॉटेलमध्ये पाच जणांची टोळी आली असून त्यांच्याकडे पिस्तुले आणि जिवंत काडतुसे आहेत.