शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बँकर्सची फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ठगाने बँकर्सची 1 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार महिला या एका सरकारी बँकेत वरिष्ठ पदावर काम करतात. गेल्या वर्षी त्याना व्हॉट्सअपवर एका ग्रुपवर जोडण्यात आले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती दिली जात होती. ग्रुपचा अॅडमिन हा शेअरबाबत टिप्स देत असायचा. त्यानंतर त्याना मोबाईलवर अॅप्स इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्या अॅप्सवर बँक खात्याची माहिती भरण्यास भाग पाडले. त्यानंतर तक्रारदार त्या अॅप्सवर जाऊन ते शेअर खरेदी करत होत्या.

बँक खात्यात रक्कम पाठवल्यावर ते शेअर खरेदी करत असायचे. त्याने एकूण 1 कोटी 35 लाख रुपये विविध बँक खात्यात पाठवले. गुंतवणूक केलेल्या पैशावर 6 कोटी रुपये नफा झाल्याचे त्याना दाखवत होते. त्याने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती रक्कम निघत नव्हती. त्या रकमेसाठी त्याने कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी संपर्क केला. त्याने ती गुंतवलेली रक्कम परत करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.