
चेंबूर कॅम्प परिसरात काम करणाऱ्या सिव्हिल कॉण्ट्रक्टरकडे खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात दोघा तोतया पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच दोघेही मोबाईल बंद करून पसार झाले आहेत.
सुनील ढकुलिया (51) या सिव्हिल कॉण्ट्रक्टरचे चेंबूर कॅम्प परिसरात कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असताना कलयुक चक्र न्यूजचा संजय म्हात्रे आणि शिंदे टाइम्स यूट्यूब न्यूजचा शशिकांत शिंदे असे दोघे ढकुलियाकडे गेले. दोघांनी त्यांची ओळख पत्रकार असल्याची सांगत तू करत असलेले काम बेकायदेशीर आहे, असे म्हणत त्याला धमकावण्यास सुरुवात केली. 15 हजार रुपये दे, अन्यथा ठार मारू असेही धमकावले.