घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

संधी मिळताच शिताफीने घरफोडी करून चुटकीसरशी पळून जाणाऱ्या एका सराईत चोराच्या अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी मुसक्या आवळल्या. निखिल कांबळे असे त्याचे नाव असून त्याच्याविरोधात 21 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

शीव-कोळीवाडा येथील सरदार नं. 1 येथील एका बंद घरात चोरी झाली होती. चोराने स्वयंपाकघराच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आतमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर सवा लाखाचे सोने-चांदीचे दागिने घेऊन तो पसार झाला. घरमालक जेव्हा परतले तेव्हा घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ निरीक्षक सुधाकर ढाणे, निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवाजी मदने व त्यांच्या पथकाने गुह्याचा तपास सुरू केला तेव्हा आरोपी निखिल कांबळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. चेंबूरच्या वाशी नाका येथील एचपी कॉलनीत निखिल राहत असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे जाऊन त्याचा शोध घेतला, पण तेथून तो पसार झाला होता.