Mumbai Crime News – दारू पाजून केले तराट…मग केले तुकडे  

दोन दिवसांपूर्वी गोराई येथे ड्रममध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून गोराई पोलिसांनी मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या. रघुनंदन पासवान असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी मोहमद सत्तारला गोराई पोलिसांनी अटक केली. रघुनंदनला दारू पाजून विळय़ाने गळा चिरून हत्या केली.

दोन दिवसांपूर्वी गोराईच्या बाबरपाडा ते पिक्सी सी रिसॉर्ट शेफाली गाव परिसरात वाटसरूंना तीव्र दुर्गंधी येऊ लागली. याची माहिती स्थानिकांनी गोराई पोलिसांना दिली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांना त्या चारही ड्रममध्ये मानवी अवयव दिसले. गोराई पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे याच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथके तयार केली.

रघुनंदन हा 31 ऑक्टोबरला तो मुंबईत आला. त्याने एका तरुणीला फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. तिच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याने सत्तारला पह्न केला. त्याने रघुनंदनला भाईंदर येथे भेटण्यासाठी बोलावले. ते दोघे एकत्र दारू प्यायले. जास्त दारू प्यायल्याने रघुनंदन हा उलटय़ा करू लागला. त्यामुळे त्याला एका दुकानात झोपवले. तेथे सत्तार हा बसून दारू पीत होता. रघुनंदन हा झोपेत असताना त्याने सत्तारने त्याचा विळय़ाने गळा चिरला. त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे केले.

मृतदेह नेण्यासाठी एका रिक्षाचा वापर केला. ते तुकडे ड्रममध्ये भरून रिक्षात ठेवले. तसेच ते ड्रम पिक्सी रिसॉर्टजवळच्या कडेला खड्डय़ात टाकले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रघुनंदन हा पूर्वी एका मेडिकलच्या दुकानात काम करायचा. तेथे त्याची एका तरुणीशी ओळख झाली. ओळखीनंतर ते पह्नवरून एकमेकांशी बोलत असायचे. नुकतीच रघुनंदन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी अंधेरी पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर अंधेरी पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल पांडे यांनी रघुनंदनचा पह्टो सोशल मीडियावर अपलोड केला. त्याचदरम्यान भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कांबळे यांना माहिती मिळाली. एका रिक्षाचालकाने सत्तारसोबत वस्तूची वाहतूक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भाईंदर पोलिसांनी रिक्षाचालक आणि सत्तारला ताब्यात घेऊन गोराई पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीदरम्यान सत्तारने हत्येची कबुली दिली. एकटय़ानेच हत्या केल्याचे सत्तारने पोलिसांना सांगितले.