मुंबईच्या कोस्टल रोडवर बर्निंग लेम्बोर्गिनी, उद्योजक गौतम सिंघानिया यांनी व्हिडीओ केला शेअर

मुंबईच्या कोस्टल रोडवर एक लक्झरी कारला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये बर्निंग कार दिसत आहे. हा व्हिडिओ इतर कोणीचाही नसून उद्योजक आणि कारप्रेमी गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, ही घटना बुधवारी रात्री जवळपास 10 वाजून 20 मिनीटांनी झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण समोर आल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी पाठवण्यात आले होते.

त्यानंतर जवळपास 45 मिनीटांच्या प्रयत्नानंतर लेम्बोर्गिनी कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एक नारंगी रंगाची लेम्बोर्गिनी कार जळत होती. घटनास्थळी उपस्थित लोकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कार जळताना दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ उद्योजक गौतम सिंघानिया यांनी बनवला आहे. यासोबतच त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंट (ट्विटर) वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये गुजरात नोंदणी असलेल्या कारच्या केबिनमध्ये आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. गौतम सिंघानिया यांनी जो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यात कॅप्शन लिहिले होते की, मुंबईतील कोस्टल रोडवर मी लॅम्बोर्गिनी जळालेली पाहिली. यासोबत त्यांनी पुढे लिहिले आहे की, अशी घटना लॅम्बोर्गिनीच्या विश्वासार्हता आणि सुरक्षा मानकांसाठी गंभीर चिंतेची बाब आहे. या व्हिडिओमुळे गौतम सिंघानिया यांनी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.