मुंबईसह राज्याच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी मुक्कामी असते. मात्र दिवसा नागरिकांना कडक उन्हाचा ‘ताप’ सहन करावा लागत आहे. पुढील आठवडाभर मुंबई शहर व उपनगरांत हीच परिस्थिती राहणार आहे. दिवसाचे तापमान 33 ते 34 अंशांच्या घरात राहील. राज्यात कोरडे वारे प्रवाहित राहिल्याने वातावरणात बदल झाला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबईच्या हवेत मागील महिनाभर गारवा होता. मात्र दोन दिवसांपासून वातावरणातील गारवा हळूहळू कमी होऊ लागला असून कमाल तापमान वाढले आहे. सांताक्रुझमध्ये मंगळवारी 34 अंश इतके कमाल तापमान नोंद झाले. पाऱयाने सरासरीपेक्षा तीन अंशांची उसळी घेतली. दुपारच्या सुमारास मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, तर किमान तापमान 16 ते 18 अंशांच्या आसपास नोंद होईल. रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. a