मुंबईत ‘थंडा थंडा, कूल कूल’

मुंबई शहर व उपनगरांत दोन दिवसांपूर्वी 36 अंशांची उच्चांकी पातळी गाठलेल्या तापमानात रविवारी अचानक तीन अंशांची मोठी घट झाली. पहाटेच्या तापमानासह दिवसाचे तापमान घसरल्याने मुंबईकरांनी सायंकाळच्या सुमारास ‘थंडा थंडा, कूल कूल’चा सुखद अनुभव घेतला. रविवारी सांताक्रुझमध्ये कमाल 33 अंश तर किमान 19 अंश इतके तापमान नोंद झाले. पुढील तीन दिवस शहरात हाच गारवा राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 7 जानेवारीला किमान तापमान 15 अंशांची नीचांकी पातळी गाठू शकते. यादरम्यान कमाल तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.