परदेशात नोकरीच्या नावाखाली इलेक्टिकल इंजिनीअरची दहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे सांताक्रुझ येथे राहतात. ते खासगी पंपनीत इलेक्ट्रिक इंजिनीअर म्हणून काम करतात. तेथे पगार कमी असल्याने त्यांना परदेशात नोकरी करायची होती. त्यासाठी त्याने काही संकेतस्थळावर बायोडाटा अपलोड केला होता. नोव्हेंबर महिन्यात ते घरी होते. त्याना एकाने पह्न केला. त्याने तो खासगी पंपनीमधून बोलत असल्याचे भासवले. ती पंपनी सिंगापूरची असून त्याना नोकरीची ऑफर दिली. त्यासाठी नोंदणी फी आणि कागदपत्रे पडताळणीसाठी पैसे जमा करावे लागतील असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने काही पैसे दिले.
पैसे दिल्यानंतर ठगाने तक्रारदार याना पह्न केला. लवकरच नियुक्ती पत्र पाठवू अशा भूलथापा मारल्या. ठगाने त्याच्याकडे पुन्हा कामाच्या नावाखाली पैशाची मागणी केली. परदेशात नोकरीसाठी जायचे असल्याने त्याने पुन्हा पैसे पाठवले. बँक खात्यात पैसे पाठवल्यानंतर त्याना नियुक्तीचे पत्र मिळाले नव्हते. त्याने त्याला संपर्क केला. मात्र काही प्रतिसाद मलाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.