मुंबई सेंट्रल डेपोतून लालपरी पुन्हा धावणार

मागील अडीच महिन्यांपासून एसटी वाहतुकीसाठी बंद असलेले मुंबई सेंट्रल एसटी स्थानक पुन्हा सुरू होणार आहे. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकात काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने येथून नियमित सुटणाऱया गाडय़ा कुर्ला नेहरूनगर, दादर, परळ आणि पनवेल स्थानकातून धावत आहेत. काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाल्याने आता वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवार 17 मार्चपासून मुंबई सेंट्रल स्थानकातून लालपरी पुन्हा धावणार आहे.