
दापोली विधानसभेतील मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा उद्या, शनिवारी सायंकाळी 6 वाजता शिवसेना भवन, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर आणि शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
दापोली विधानसभा संपर्पप्रमुख सचिन बाळपृष्ण पाटील यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला जिल्हासंपर्पप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख बाळाराम खेडेकर, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव, विधानसभाप्रमुख मुजिबभाई रुमाणे, दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवले, खेड तालुकाप्रमुख दत्ता भिलारे, खेड गुहागर संपर्प संघटक ज्योती भोसले, दापोली मंडणगड संपर्प संघटक स्नेहल महाडिक हे देखील उपस्थित राहणार आहेत. दापोली विधानसभेतील मुंबईवासीय आजी-माजी महिला व पुरुष पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, ज्येष्ठ शिवसैनिकांनी निर्धार मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.