मुंबई तापणार, उत्तर महाराष्ट्रासह मुंबईला हवामान विभागाचा इशारा

उन्हाळा सुरू झाला असून संपूर्ण राज्यात शरीराची लाही लाही करणारे ऊन आहे. त्यात राज्याचे तापमान आणखी वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुढील 48 तासांत मुंबईचे हवामान 35 अशं सेल्सियस असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रालाही तापमान वाढीचा इशारा दिला आहे. नंदूरबार, जळगवाळ, धुळे आणि नाशिकमध्ये 40 अंशापर्यंत पारा वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.