
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-1 व टी-2 टर्मिनल येथे 1 जूनपासून प्रीपेड ऑटोरिक्षा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत परिवहन विभाग आणि अदानी समूहाला निर्देश दिले गेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. त्यामुळे अदानी समूह आणि परिवहन विभागाच्या समन्वयातून पुढील दोन महिन्यांत प्रीप्रेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. विमानतळावर प्रीपेड ऑटोरिक्षाची सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबत विधान भवनात बैठक झाली. या बैठकीत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिले. यावेळी नाशिक, सिंधुदुर्ग जिह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.