
धावपट्टीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 9 मे रोजी सहा तास बंद ठेवला जाणार आहेत. सर्वाधिक व्यस्त विमानतळ अशी मुंबईची ओळख आहे. पावसाळय़ात विमानांचे सुरक्षित लँडिंग व टेक ऑफ होण्याकरिता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने ही माहिती दिली. पावसाळय़ाआधी हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. 09/27 व 14/32 या दोन्ही धावपट्टय़ांवर देखभालीची कामे केली जाणार आहेत. याची सूचना सहा महिने आधीच विमान चालकांना देण्यात आली आहे. जेणेकरून विमानांचे वेळापत्रक व नियोजन योग्य प्रकारे होऊ शकेल, असे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले.