मुंबई विमानतळावर एक धक्कदायक घटना समोर आली आहे. फ्लाईट चुकली म्हणून एका महिलेने ओला चालकालाच मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महिलेला विमान प्रवासासाठी घरुन निघाली. मात्र तिला घरुन निघण्यासाठी उशिर झाल्याने ती विमानतळावर वेळेत पोहचू शकली नाही. यामुळे तिची फ्लाईट चुकली. यामुळे संतापलेल्या महिलेने चक्क ओला चालकालाचा जबाबदार धरत मारहाण करण्यास सुरवात केली.
उपस्थित लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला ऐकायला तयार नव्हती. महिलेने कॅबचालकाला शिवीगाळ आणि मारहाण सुरूच ठेवली. उपस्थित लोकांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत पीडिताला नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.