विमानतळावर कोट्यवधीचे हिरे, सोने जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ तस्करांना पकडून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱयांनी त्यांच्याकडील 62 कोटी 59 लाखांचे सोने, हिरे आणि ड्रग्जचा साठा कस्टम अधिकाऱयांनी जप्त केला आहे. बँकॉकला निघालेल्या एका प्रवाशाकडे 94 लाख किमतीचे हिरे सापडले. दुसऱ्या कारवाईत रियाध आणि मस्कतहून आलेल्या दोन प्रवाशांकडे दोन किलो 73 ग्रॅम वजनाचे सोने मिळून आले. तिसऱ्या कारवाईत कस्टम अधिकाऱयांनी पाच प्रवाशांना अटक केली. त्यांच्याकडे 50 किलो 116 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक वीड सापडले.