मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. 10 ते 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विरार- चिंचोटीपासून ते नायगावपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनमध्ये ही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच अवजड वाहनांची कोंडी झाली आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी होण्यामागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून वाहतूक पोलिसांकडून ती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.