पादचाऱ्यांचा किंमती ऐवज घेऊन पसार होणारी दुकली गजाआड

एका 63 वर्षीय वृद्धेला फसवून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने शिताफीने काढून घेत दोघे पसार झाले; पण मुलुंड पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून गुह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

लीला शेट्टी या वृद्धा एम.जी. मार्गावरून जात असताना त्यांना दोघांनी रस्त्यात अडवले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत लीला यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. “ आपको जो तकलीफ है, मै जानता हू., मै आपकी तकलीफ दूर कर सकता हू. मै वाराणसी से आया हू असे त्यांना सांगू लागले. तसेच  ‘आपसे एक गलती हुई है, इसिलिऐ लक्ष्मी आपसे नाराज है, पर मै आपको इलाज बताता हू।’ असे भावनिक करत लीला यांना त्यांच्या अंगावरील दागिने पर्समध्ये काढून ठेवण्यास सांगितले. मग ती पर्सच घेऊन आरोपी पसार झाले. लीला यांनी तक्रार दिल्यानंतर मुलुंड पोलिसांनी तपास करत इरफान इमदाद शेख (25) आणि फिरोझ खैरुद्दीन (42) असे दोघांना पकडले. इरफान उत्तराखंड, तर फिरोझ यूपीचा आहे. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.