पुणे व वरळीतील हिट अँड रन केसने महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता मुंबईतल्या मुलुंड भागात एका रईसजाद्याने त्याच्या ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली आहे. या धडकेत दोन्ही रिक्षांचे चालक व रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील एका रिक्षाच्या चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान ऑडी चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील डंपिंग रोडवर एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत चार जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.