महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार – विनायक राऊत

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. ‘टिव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहीनीशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.’

विनायक राऊत म्हणाले की, ”महाराष्ट्रात आताच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. इतर सोई सुविधा मिळत असतात त्यावरही परिणाम झालेला आहे. लाखो-कोरोडो रुपयांच्या कर्जांत महाराष्ट्र बुडालेला आहे. यातच भविष्यात अर्थव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान अर्थमंत्री अजित पवार कसं पेलवतील, यावर प्रश्नचिन्ह आहे.”

राऊत पुढे म्हणाले की, ”महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बाहीन योजना कायमस्वरूपी बंद होणार.”