दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने अनेक कंपन्यांना मागे टाकत नंबर वन स्थान पटकावले आहे. जिओची एकूण ग्राहक संख्या 49 कोटीपर्यंत पोहोचली आहे. यात 13 कोटी 3 जी ग्राहक आहेत. जिओ 5जी सेवेतही सर्वात मोठी कंपनी बनली आहे. जिओने चीनलाही मागे टाकले आहे. डेटा ट्रफिकमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी जिओ बनली आहे. रिलायन्स जिओच्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, जिओचा डेटा 32.8 टक्क्यांनी वाढून तो आता 44 अब्ज गीगाबाइट (जीबी) झाला आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात आधी 5जी सर्विस सुरु केले आहे. त्यामुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सने सध्याची सर्विस पोर्टेबल करत जिओ सर्विस घेतली आहे.