बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता पुण्यात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख सुद्धा सहभागी होणार असून मोठ्या संख्येने लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड आणि परभणीत सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली होती. आता 5 जानेवारी रोजी पुण्यात मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये देशमुकख यांची कन्या वैभवीही सामील होणार आहे. पुण्यातील लाल महालपासून हा मोर्चा निघणार आहे. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी या मोर्चातून केली जाणार आहे.