दिवाळी पर्वात उद्या लक्ष्मीपूजन असून सायंकाळी 6.04 ते रात्री 8.35 हा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. हा मुहूर्त साधण्याचे नियोजन सर्वांनीच केले आहे. दिवाळीनिमित्त शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग होते. या वर्षी उद्या संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत स्टॉक एक्स्चेंज बीएसई आणि एनएसईवर एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र होईल. त्याचे प्री-ओपनिंग सत्र सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत असेल.
मुहूर्त ट्रेडिंग टाइम स्लॉटमध्ये इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्हज, करन्सी डेरिव्हेटिव्हज, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग ऍण्ड बोरोइंग यांसारख्या अनेक विभागांमध्ये ट्रेडिंगदेखील दिसेल. बीएसई-एनएसईने स्वतंत्र परिपत्रकाद्वारे याची घोषणा केलेली आहे.
मार्केट घसरले
शेअर बाजार 31 ऑक्टोबर रोजी सलग दुसऱया सत्रात मोठय़ा घसरणीने बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 553.12 अंकांनी घसरून 79,389.06 वर बंद झाला. निफ्टी 135.50 अंकांनी घसरून 24,205.30 वर आला. शेअर बाजारात गुरुवारी 2559 अंकांनी वाढ नोंदवली, तर 1188 शेअर्स घसरले.