ब्रिटनमध्ये ‘मोहम्मद’ नावाला सर्वाधिक पसंती

ब्रिटनने 2023 या वर्षातील मुलामुलींच्या सर्वाधिक लोकप्रिय नावांची यादी नुकतीच जाहीर केली. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या (ओएनएस) आकड्यानुसार, गेल्या वर्षी ‘मोहम्मद’ हे नाव टॉपवर होते. त्याच वेळी एलिझाबेथ आणि चार्ल्स या नावांची लोकप्रियता कमी झालेली दिसून आली.

ओएनएस माहितीनुसार, गेल्या वर्षी इंग्लंड आणि वेल्स येथे अधिकतर पालकांनी मुलाचे नाव मोहम्मद ठेवले. मोहम्मद नावाने 4,661 मुलांची नोंदणी झाली होती. हे 2023 च्या तुलनेत 484 अधिक आहे. मुलींच्या टॉप-3 नावांमध्ये ऑलिव्हिया, एमिलिया आणि इस्ला यांचा समावेश आहे. ही तीन नावे गेल्या 15 वर्षांपासून टॉप-3 मध्ये आहेत. 2016 पासून ऑलिव्हिया हे नाव अव्वल स्थानावर आहे.