
यवतमाळ-अमरावती मार्गावर राज्य परिवहन विभागाच्या धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. चोर माऊली गावाजवळ बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये आग लागताच चालक, कंडक्टर आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर पळ काढला. यामुळे कोणतीही जीवितहानी घडली नाही. आगीत बस जळून खाक झाली.
शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने अथक प्रयत्न करत बसला लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत आगीमुळे शिवशाही बस राख झाली होती.