MERC चा ग्राहकांना शॉक, वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MSEB) 28 मार्च रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा आदेश 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार होता, परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचं महावितरणने निदर्शनास आणून दिलं. एप्रिल महिन्या अखेरीस महावितरणकडून सविस्तर पुनरावलोकन याचिका सादर करण्यात येणार आहे. दरम्यान या तात्पुरत्या स्थगितीमुळे महावितरणच्या ग्राहकांना जुन्या दराप्रमाणे वीज बिल येणार आहे.

याबाबत माहिती देताना महावितरणच्या वकिलांनी सांगितलं की, या वीज दर आदेशातील चुका आणि विसंगती या वर्ष 2025-26 ते 2029-30 या 5 वर्षांच्या नियामक कालावधीतील वीज दराच्या मूळ स्वरूपावर परिणाम करत आहेत. महावितरणने मागणी केली आहे की, हे दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे आणि अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी. त्यानंतर याला स्थगिती देण्यात आली आहे.