IPL 2025 – माही कॅप्टन होताच सौरभ गांगुलीचे मोठे विधान, म्हणाला…

आयपीएल 2025 मध्ये शुक्रवारी चेत्रई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना रंगला. या सामन्यात को हाईच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज होती ती म्हणजे धोनी आता चेन्नईचे कर्णधारपद सांभाळताना दिसला. ऋतुराजच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने तो आता हा आयपीएल हंगाम खेळणार नाही. धोनीची कर्णधार झाल्याची बातमी येताच आता त्यावर सौरव गांगुली यनि आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला असा विश्वास आहे की, महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये खेळावे, धोनी जेव्हा कर्णधार असतो तेव्हा तो वेगळ्याच रंगात दिसतो. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे संघाबाहेर राहिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 च्या उर्वरित हंगामासाठी धोनीची कर्णधार म्हणून घोषणा केली. या हंगामात धोनीवर त्याच्या खराब फॉर्ममुळे आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे बरीच टीका झाली आहे.

गांगुली म्हणाला, माझा असा विश्वास आहे की जर एमएस धोनीला सीएसकेकडून खेळायचे असेल तर त्याला कर्णधारच राहावे लागेल. कारण जेव्हा तो कर्णधार होतो तेव्हा तो वेगळ्याच रंगात दिसतो. चेन्नई सुपर किंग्जने सलग चार सामने गमावले असताना धोनीने कर्णधारपदी पुनरागमन केले आहे. 2023 मध्ये पाचवे विजेतेपद जिंकल्यानंतर धोनीचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना असेल.

गांगुली म्हणाला, ‘धोनी अजूनही षटकार मारत आहे. गेल्या सामन्यात आपण ते पाहिले. तो आता 43 वर्षांचा आहे आणि 2025 मध्ये खेळायचा तसा तो आता खेळू शकत नाही. हे स्वाभाविक आहे. पण मला वाटतं त्याच्यात अजूनही षटकार मारण्याची ताकद आहे. इतका अनुभव आणि खेळाची समज असल्याने, तो सीएसकेसाठी जे योग्य आहे ते करेल.

कोलकाता नाईट रायडर्सना ईडन गार्डन्सवर तीनपैकी दोन सामने गमावल्याबद्दल विचारले असता गांगुली म्हणाला, याबद्दल अजिंक्य रहाणेला विचारा. फक्त तोच उत्तर देऊ शकेल. शेवटच्या सामन्यात तो विजयाच्या अगदी जवळ होता. त्यांच्याकडे उत्तम खेळाडू आहेत. मला काळजी वाटते की रिंकू सिंग फलंदाजीच्या क्रमाने खूपच खालच्या क्रमांकावर येत आहे.