लोकलच्या आर्थिक स्थिरतेसाठी अभ्यास

उपनगरी लोकलचा विकास आणि आर्थिक स्थिरतेसाठी तांत्रिक अभ्यासावर भर दिला जाणार आहे. यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सध्याच्या खर्चाची जागतिक पातळीवर तुलना, देखभाल खर्च, नावीन्यपूर्ण वित्त पुरवठा मॉडेल्सचा शोध व ऊर्जा कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे हे अभ्यासाचे उद्दिष्ट आहे. हा अभ्यास जुलै 2027 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. एमआरव्हीसी आणि आयआयटी मुंबईमार्फत केल्या जाणाऱ्या अभ्यासातून पुढे येणारे निष्कर्ष आम्हाला भविष्यातील विकास प्रकल्प राबवण्यासाठी दिशादर्शक ठरतील, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.