रिऍलिटी शोसाठी यूट्यूबरने उभारले 119 कोटींचे शहर

अमेरिकेच्या कंसास भागात राहणारा मिस्टर बिस्ट हा जगातील सर्वात मोठा यूट्यूबर आहे. त्याने नुकतीच त्याच्या नव्या शोची घोषणा केली. ‘बीस्ट गेम्स’ असे त्याच्या रिऍलिटी शोचे नाव आहे. या शोसाठी मिस्टर बीस्टने एक भव्यदिव्य सेट तयार केला आहे. हा सेट म्हणजे मिनी शहरच जणू. यासाठी त्याने तब्बल 14 मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 119 कोटी रुपये खर्च केले.