
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या वर्षीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे (यूपीएससी) डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येणार आहेत तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.