‘एमपीएससी’ परीक्षा एक महिना पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा 27, 28 आणि 29 मे रोजी होणार आहे. ही परीक्षा 26 ते 28 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र ही परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना तयारीसाठी वाढीव कालावधी मिळणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा -2024 मधील राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 करिता 12 मार्च 2025 रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या पूर्व परीक्षेच्या निकालातून पात्र ठरलेल्या काही EWS अथवा OPEN मधून SEBC अथवा विकल्प निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित पर्याय दिसून न आल्याने यासंदर्भात उमेदवारांकडून निवेदने प्राप्त झाली होती. याची दखल घेत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून याबाबत आयोगाने शुद्धिपत्रक जारी केले आहे.