ओबीसीतून कोणाला आरक्षण देऊ नये, द्यायच असेल तर स्वतंत्र आरक्षण द्या; खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भाजपला सल्ला

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. ओबीसीतून कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. याच मुद्द्यावरुन नवनिर्वाचीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी संघाच्या सत्कार कार्यक्रमात बोलत असताना आपले परखड मत व्यक्त केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहाला संबोधित करताना आपले परखड मत त्यांनी व्यक्त केले. “कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण आरक्षण देताना ओबीसीतून कोणालाही आरक्षण देऊ नका. आरक्षण द्यायच असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी बांधव स्वस्त बसणार नाही. गरज पडली तर मी सुद्धा खांद्याला खांदा लावूण रस्त्यावर उतरेन”, असे खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार सुधाकर अडबाले, महासचिव सचिन राजूरकर सतीश भिवगडे, जयदीप रोडे, राजेश नायडू, दिनेश चोखारे, पप्पू देशमुख यांच्यासह ओबीसी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक संघटना आणि इतर सामाजिक संघटना, चंद्रपूरच्या वतीने खासदार धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.