प्रँक करण्याच्या नादात नको ते करुन बसले, मित्रांमुळे तरुणाने प्राण गमावले

प्रँक करताना मित्रांनी कंप्रेसरने शरीरात हवा भरल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली. मोतीराम असे मयत तरुणाचे नाव असून तो जगन्नाथ दाल मिलमध्ये नोकरी करत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी कारखान्यातीव सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत. तसेच कारखान्याच्या मॅनेजरचीही चौकशी करत आहेत.

इंदौरच्या तीन इमली पालडा येथील रहिवासी असलेला मोतीराम रविवारी नेहमीप्रमाणे कामावर गेला. तेथे त्याच्या मित्रांनी मस्करी म्हणून त्याच्या शरीररात कंप्रेसरने हवा भरली. यानंतर मोतीराम अस्वस्थ झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत होता.

उपचार सुरु असतानाच काही वेळात मोतीरामचा मृत्यू झाला. याप्रकरणी संयोगिता गंज पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच मस्करी करणाऱ्या मित्रांचीही ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.