मध्यरात्री वेदना होऊ लागल्या, अंधारात चुकून डॉक्टरच्या औषधांऐवजी उंदिर मारण्याचं औषध घेतलं, महिलेचा मृत्यू

एका महिलेला मध्यरात्री भयंकर वेदना होत होत्या. त्यामुळे अंधारात उठून नेहमीची औषधं घेतली. पण औषधांऐवजी चुकून उंदिर मारण्याचं औषध घेतलं आणि महिलेची प्रकृती बिघडली. यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मिसरोद येथे ही धक्कादायक घटना घडली. सरजू पाटीदार असे मयत महिलेचे नाव आहे.

सरजू यांना अनेक दिवसांपासून संधीवाताचा त्रास होता. गुरुवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्यांना वेदना जाणवू लागल्या. यामुळे त्या अंधारात उठून औषधं शोधू लागल्या. अंधारात त्यांनी खऱ्या औषधांऐवजी चुकून उंदिर मारण्याचं औषधं खाल्लं. यानंतर त्यांना उलट्या झाल्या आणि त्यांची तब्येत बिघडू लागली.

कुटुंबियांनी सरोज यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. महिलेने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला होता.