न्यू ईअर पार्टीसाठी गेलेले चौघे मित्र घरी परतलेच नाहीत. चार दिवसांनी चौघांचेही मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळले. मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे ही घटना घडली. घटना उघडकीस येतातच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी सेप्टिक टँकजवळ जाऊन पाहिले. यानंतर घटनेचा उलगडा झाला. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सिंगरौली जिल्ह्यातील बाडोखर गावात ही घटना घडली. प्रसाद प्रजापती नामक व्यक्तीच्या घरामागील सेप्टिक टँकमध्ये हे मृतदेह आढळून आले.
दरम्यान, या हत्या प्रकरणी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. चौघांची कोणत्या कारणातून झाली? कुणी केली? याबाबत पोलीस तपास करत आहेत.