पोटात दुखत होतं, श्वास घ्यायला त्रास; 15 वर्षाच्या मुलीचा वैद्यकीय अहवाल पाहून डॉक्टरही चक्रावले

एका 15 वर्षाच्या मुलीच्या वारंवार पोटात दुखत होतं. तसेच तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. पालकांनी तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर मुलीचा वैद्यकीय अहवाल पाहून डॉक्टरही हैराण झाले. मुलीच्या अंडाशयात 8 किलो वजनाची गाठ आढळली. यानंतर इंदूर येथील महाराजा तुकोजीराव सरकारी रुग्णालयात मुलीवर यशस्वा शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. सुमित्रा यादव आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेपूर्वी मुलीचे वजन 39 किलो होते. मुलीला श्वास घेण्यास त्रास, पोटदुखीसह अन् आरोग्याच्या समस्या होत्या. तपासणीदरम्यान तिच्या अंडाशयात एक गाठ दिसली. यानंतर अतिशय गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली, असे डॉ, यादव यांनी सांगितले.

मुलीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुलीच्या पोटातून काढलेली गाठ हिस्टोपॅथोलॉजी तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.