बीयर बॉटल अन् बॉयफ्रेंड; ‘काम झालं’ अल्पवयीन पत्नीने नवऱ्याला 36 वेळा भोसकलं

लग्न करुन आयुष्याची नवीन सुरुवात करणं एका 25 वर्षीय तरुणाला महागात पडलं आहे. अल्पवयीन पत्नीनेच त्याचा खून केला आहे. पहिल्यांदा बीयर बॉटलने आणि त्यानंतर तब्बल 36 वेळा त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यानंतर पत्नीने बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल केला आणि नवऱ्याची बॉडी दाखवत ‘काम झालं’ असं म्हणत एक प्रकारे आनंद व्यक्त केला. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर जिल्हा हादरून गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी मयत राहुल याचा मृतदेह इंदौर-इच्छापूर रोडजवळ एका झुडपात आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता मृत्यू झालेल्या राहुलची 17 वर्षीय पत्नी कुमारी (बदलेले नाव) घटना झाल्यानंतर फरार झाली होती. याच दरम्यान तिचे युवराज नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी युवराजला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान कुमारीने युवराजला व्हिडीओ कॉल करत राहुलची रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दाखवला आणि काम झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ती तिचा मित्र ललीत सोबत पळून गेली.

अशी केली हत्या

ज्या दिवशी राहुलची हत्या करण्यात आली त्या दिवशी कुमारी राहुलसोबत शॉपींग करण्यासाठी बाहेर गेली होती. हा कटाचाच एक भाग होता, याची कल्पना राहुलला नव्हती. मार्केटवरुन घरी जात असताना ललीत त्यांच्या मागावर होता. ITI कॉलेजच्या जवळ आले असता स्पीड ब्रेकरवर तीने मुद्दाम चप्पल खाली पाडली आणि राहुलला गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबवताच दुचाकीवरून आलेल्या ललीतने आणि कुमारीने राहुलवर हल्ला केला. कुमारीने प्रथम बीयर बॉटलने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर ललीत आणि कुमारीने मिळून धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कुमारी, युवराज आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.