
मेहुणीवर एकतर्फी प्रेम जडला. मात्र तिचा पती या प्रेमात अडथळा ठरत होता. यामुळे क्राईम पेट्रोल शो आणि भौकाल वेब सिरीज पाहून एका इसमाने आपल्या साडूची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नवरत्न गुप्ता असे अटक आरोपीचे नाव आहे.
गौतम नगर पोलीस ठाण्याअंतर्गत पीजीबीटी कॉलेजजवळ मयत सोनू गुप्ताचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान सोनूचा साडू नवरत्नचे त्याच्या घरी येणे-जाणे असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर सोनूच्या घराजवळील परिसरातील सीसीटीव्हीतही नवरत्न कैद झाला होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी मुंबईतीव घाटकोपर परिसरातून नवरत्न ताब्यात घेतले. नवरत्नची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मेहुणीवर एकतर्फी प्रेम होते, मात्र साडू आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने आपण त्याचा काटा काढल्याचे नवरत्नने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नवरत्नला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.