
मेरठ हत्याकांडानंतर ग्लाल्हेरमध्येही एका पतीने आपल्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. याप्रकरणी पीडित पतीने मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी धरणे आंदोलन सुरू केले आहे. अमित कुमार सेन असे पीडित पतीचे नाव आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या केल्याचाही आरोप अमितने केला आहे.
ग्वाल्हेरमध्ये मेहंदीवाला सैय्यद परिसरात अमित सेन राहत असून त्याच्या पत्नीचे लग्नानंतरही अनेक प्रियकर आहेत. सध्या राहुल नामक व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. आपल्या मुलालाही ती सोबत घेऊन गेली आणि प्रियकराच्या साथीने मुलाची हत्या केली, असा आरोप अमितने केला आहे.
पोलिसात अनेकदा तक्रार दिली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असे अमितचे म्हणणे आहे. अखेर अमितने मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी करत ग्वाल्हेरच्या फुलबाग चौकात धरणे आंदोलनाला बसला आहे. पत्नीवर तात्काळ कारवाई न केल्यास आपलीही हत्या होऊ शकते अशी भीती अमितने व्यक्त केली आहे. पोलिसांनी अमितचा आरोप फेटाळून लावत त्याने कोणतीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहेत.