आई दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुरु झाली, त्यानंतरचा व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या तान्हुल्याला दूध आणण्यासाठी एक आई ट्रेनमधून खाली उतरते. दरम्यान रेल्वे सुरु होते आणि महिला त्या रेल्वेमागे धावताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी एक रेल्वे गार्ड देवदूत बनून तिच्याजवळ येतो आणि तो जे करतो त्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या बाळाला दूध आणण्यासाठी रेल्वेतून खाली उतरते आणि त्याचवेळी रेल्वे सुरु होते. घाबरगुंडी उडालेली महिला अस्वस्थ होत ढसाढसा रडू लागते. दरम्यान त्यावेळी एक रेल्वे गार्ड देवदूत बनून तिच्याकडे येतो. यानंतर महिलेने गार्डला सर्व काही सांगितल्यावर तो ट्रेन थांबवतो आणि ती महिला धावत ट्रेनमध्ये चढते. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ @Gulzar_sahab यावरुन शेअर करण्यात आला असून तो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत 13 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर युजर्सनी वेगवगेळ्या प्रतिक्रिया देत त्या गार्डचे कौतुकही केले आहे. मात्र, खरे प्रकरण काय आहे याची पुष्टी देण्यात आलेली नाही.