काय सांगता! 6 मुलांची आई भिकाऱ्यासोबत पळाली; नवऱ्याची पोलीस स्टेशनमध्ये धाव

सहा मुलांची आई असलेली एक महिला मुलांना आणि नवऱ्याला सोडून एका भिकाऱ्यासोबत पळाल्याची घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिह्यात उघडकीस आली आहे. बायको भिकाऱ्यासोबत पळाल्यानंतर नवऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत भिकाऱ्याविरोधात अपहरणाचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

45 वर्षीय राजू नावाचा हा व्यक्ती बायको आणि आपल्या सहा मुलांसोबत हरदोईच्या हरपालपूर भागात राहत होता. राजेश्वरी असे या महिलेचे नाव असून ती 36 वर्षांची आहे. तिला 6 मुले आहेत. याच भागात 45 वर्षांचा नन्हे पंडित नावाचा एक भिकारी सतत यायचा. सुरुवातीला कधी कधी राजेश्वरीशी बोलायचा. काही दिवसांनंतर तो तिच्याशी फोनवरसुद्धा तासन्तास बोलत असायचा, असे राजूचे म्हणणे आहे. पोलिसांनी कलम 87 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.