जुळ्यांना आईनेच बुडवून मारले

मुलांची वाढ नीट होत नसल्याने आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात घडली. जुळ्या मुलांना टाकीत बुडविल्यानंतर आईनेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र ती बचावली. जुळ्या मुलांचा खून केल्या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आईला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे माहेर थेऊर परिसरात आहे. सध्या ती माहेरी राहत होती. विवाहानंतर दहा वर्षे अपत्यप्राप्ती न झाल्याने दाम्पत्याने पृत्रिम गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला. टेस्टटय़ूबद्वारे त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. जुळी मुले दोन महिन्यांची होती. त्यांची वाढ नीट होत नसल्याने महिला तणावात होती. मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास जुळ्या मुलांना घेऊन महिला घराच्या छतावर गेली. त्यानंतर दोन्ही मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले.