
घरातच बाळंतपण करणे एका आदिवासी महिलेच्या जीवावर बेतले आहे. प्रसूती सुरू असताना ती बेशुद्ध झाली आणि या महिलेचा नवजात अर्भकासह मृत्यू झाल्याची घटना आज घडली. माधुरी मुकणे असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून ती कर्जत तालुक्यातील भालिवडी या गावात राहत होती. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वशेले ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.